You are currently viewing सतारीचे सूर..

सतारीचे सूर..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम चित्रकाव्यरचना*

 

सतारीचे सूर..

 

सतारीचे सूर छेडीत, प्रार्थी ती शारदेला

मग्न, बेधुंद होऊनी, आळवितसे सुराला

मंद मधुर गोड धून, मधुर ती सुरावट

भारलेली मैफल अन् , सुर ते अनवट

उतरली परीरूपे “मॉ”, आशीष द्याया साधिकेला

मग्न बेधुंद होऊनी,आळवीतसे सुराला. —||१||

 

संगीत साधना एक तप, वर्षानुवर्षे व्यासंग

ध्यास, ध्येय, धून लय, मनांत प्रेरक उमंग

फळ अजि मिळाले या,मंगल तपाचरणाला.

मग्न बेधुंद होऊनी, आळवीतसे

सुराला ||२||.

 

नादावलेली ही घटिका, सुरात

रमलेली तरूणी

मुखावर विलसतसे, सुंदर ती प्रभा आरूणी

वाह् वाह् गुंजतसे, कुर्नीसात कांचन योगाला.

मग्न बेधुंद होऊनी, आळवितसे

सुराला||३||

 

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा