मुंबई –
समाजात समानता, सहिष्णुता, अखंडता, सदाचार, प्रेमभाव व एकात्मता नांदावी या उदेशाने श्री सद्गुरू सेवा मंडळ ( रजि) प्रतिवर्षी कार्यरत असते. यावर्षी भव्य संगीत रामायण कथा व ग्रंथराज पारायण सोहळा रविवार दि. २६ जानेवारी ते रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दिना बामा पाटील रंगमंच भांडुपगाव (पूर्व) येथे आयोजन केले आहे. उद्घाटन शुभारंभ सकाळी दहा वाजता कलश पुजन, दिप प्रज्वलन, वीणा पुजन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पुजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येईल. तसेच शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला असून शनिवारी दुपारी दोन वाजता मोफत तुळशी वृंदावन वाटप सायंकाळी दिंडी सोहळा व नगर प्रदक्षिणा या सोबत विविध आध्यात्मिक कार्यक्रमात पारायण नेतृत्व ह.भ.प. मंगलाताई महाराज सागवेकर कळवा, हरिपाठ ह भ.प. जितेंद्र महाराज आवारे नवी मुंबई, श्री श्रीरंग महाराज बोराडे ठाणे विशेष म्हणजे यावेळी श्रीराम चरित्र मानस प्रवक्ते प.पु.गुरू शास्त्रीजी महाराज, वाराणसी यांचे परम शिष्य, विदर्भ रत्न ह. भ.प. हरिओम महाराज निंबाळकर (शास्त्रीजी) नागपूर यांच्या प्रगल्भ, भावपूर्ण, रसाळ वाणीतून संगीत रामायण कथा यांची पर्वणी लाभणार आहे. तरी समस्त भाविकांनी संगीतमय रामायण कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचा लाभ घ्यावा तसेच दि. २ फेब्रुवारी रोजी काल्याचे किर्तनच्या बरोबरच महाप्रसाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अध्यक्ष ह.भ.प.दिनेश शेलार, सचिव ऍड. शंकर चिलप यांनी संयुक्तिक आवाहन केले आहे.
