You are currently viewing विश्व हिंदू परिषद मातृशक्ति दोडामार्गच्या वतिने सामूहिक हळदी-कुंकू समारंभ संपन्न

विश्व हिंदू परिषद मातृशक्ति दोडामार्गच्या वतिने सामूहिक हळदी-कुंकू समारंभ संपन्न

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

विश्व हिंदू परिषद मातृशक्ति दोडामार्गच्या वतिने सामूहिक हळदी-कुंकू समारंभ संपन्न

दोडामार्ग

विश्व हिंदू परिषद मातृशक्ति दोडामार्गच्या वतिने रविवार दि-१९ जानेवारी रोजी महाराजा हॉल दोडामार्ग येथे सामूहिक हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या हळदी-कुंकू समारंभाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

या हळदी कुंकू समारंभात मातृशक्ति, जिल्हा संयोजिका सौ. वर्षा मडगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी विश्व हिंदू परिषद च्या मातृशक्ती सहसंयोजिका सौ. चैताली भोळे, दोडामार्ग नगरपंचायत नगरसेविका सौ.संध्या प्रसादी, शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख चेतना गडेकर, यांसह महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

यावेळी सौ.कविता गवस यांची मातृशक्ती प्रखंड प्रमुख दोडामार्ग पदी निवड करण्यात आली तर सौ. रुचा धर्णे यांची मातृशक्ती सत्संग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच मातृशक्ती कार्यकर्त्या म्हणून सौ. गौरवी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा