*कवी उत्तम सदाकाळ यांच्या जंगल गाणी काव्यसंग्रहास प्रथम पुरस्कार*
*उत्तम सदाकाळ यांच्या “जंगल गाणी” या बालकविता संग्रहास प्रथम क्रमांकाचा “अक्षर साधना राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार प्रदान“*
साहीत्य कला विचारमंच व उचाट शिक्षण संस्था यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात १९ जानेवारी २०२५ रोजी उत्तम सदाकाळ यांच्या “जंगल गाणी” या बालकविता संग्रहास प्रथम क्रमांकाचा “अक्षर साधना राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार “ डॉ.श्रीकांत पाटील (जेष्ठ साहित्यिक,कोल्हापूर), डॉ.ज्योतीताई ठाकरे (केंद्रीय नियामक मंडळ सदस्या,कोमसाप), व श्री.महेश म्हात्रे (मुख्यसंपादक,महाराष्ट्र रिसर्च सेंटर) यांचे हस्ते उचाट(वाडा,पालघर)येथे प्रदान करण्यात आला.
साहित्यिक उत्तम सदाकाळ यांना मिळालेला हा आतापर्यंतचा २२ वा पुरस्कार असून, उत्तम सदाकाळ यांची “पाऊस”ही कविता इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली आहे.
पुरस्कार प्राप्त “जंगल गाणी” हा बालकविता संग्रह प्रा.राजेंद्र सोनवणे (साईराजे पब्लिकेशन,पुणे) यांनी प्रकाशित केला असून, लहानांबरोबर थोरांचेही मन मोहून घेईल इतका कवितासंग्रह सुंदर बनविला आहे.
या संमेलनासाठी महाराष्ट्रातून अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित होते. सकाळी ग्रंथ दिंडीने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली व आमंत्रित जेष्ठ मान्यवरांचे हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर साहित्यकृती पुरस्कार प्रदान करण्यात आले. संमेलनाचे संयोजक ज्येष्ठ साहित्यिक विजय जोगमार्गे यांच्या अथक परिश्रमातून व नेटक्या नियोजनामुळे संमेलन यशस्वीपणे पार पडले. त्यांच्या या निवडीबद्दल व पुरस्काराबद्दल नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने त्यांचा अभिनंदन करण्यात येत आहे.