*सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारा तर्फे प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा.*
वेंगुर्ला
वेंगुर्ला आगारातील वाहतूक निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्या मनमानी कारभारामुळे वेळोवेळी आगार व्यवस्थापक यांच्या निदर्शनास आणून देखील त्या वर आगार व्यवस्थापक यांनी कोणतीही दखल न घेतल्याने सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या आगार कार्यकारणीने २६ जानेवारी २०२५ रोजी आगाराच्या गेटवर उपोषणास बसणार असल्याचे पत्र आगार व्यवस्थापक यांना दिनांक १३-०१-२०२५ रोजी देण्यांत आले, कर्मचाऱ्यांवर वेळोवेळी होणारा अन्याय, कर्मचाऱ्यांना देण्यांत येणारी उद्धट वर्तणूक, चुकीच्या पद्धतीने करण्यात येणारी प्रशासकीय कामे, चुकी नसतानाही कर्मचाऱ्यांना देण्यांत येणारी आरोप पत्रे , कर्मचाऱ्यांना धमकावणे, या मुळे कर्मचारी काम करण्याच्या मानसिकतेत नसून सदर वाहतूक निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांची तात्काळ आगारातून बदली करण्यात यावी या साठी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या सर्व पदाधिकारी यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.
*या वेळी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे विभागीय सचिव श्री भरत चव्हाण, विभागीय सहसचिव श्री स्वप्निल रजपूत, आगार सचिव श्री दाजी तळवनेकर, आगार उपाध्यक्ष श्री सखाराम सावळ, श्री अनंत झोरे ,श्री महादेव भगत, श्री ए.एम.नाईक अक्षय येसाजी, रामदास केदार, इतर पदाधिकारी उपस्थित होते.*

