*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”शिल्पकार”*
मनुष्य आहे आपल्या जीवनाचा शिल्पकार
ईच्छा कर्तृत्व कष्टानं स्वप्न होई साकारIIधृII
पृथ्वीवर कोण कसा जन्मास आला कोठून
सार्थक करावे नर जन्म मिळाला वरदान
ध्येयाने पुढे जाता आनंदाला येईल बहरII1II
समस्या संघर्षांनी व्यापले आहे जीवन
सबुरी ज्ञान प्रकाश करील मार्गदर्शन
प्रत्येकासाठी आशेचा दीप राहे आधारII2II
सर्वत्र जाणवे संघर्ष कुटुंबात देशांत
प्रत्येकाने समजुतीनं टाळावा मतभेद
सामंजस्य संघशक्ती करीलच उद्धारII3II
ज्ञान आत्मसात करण्यासाठी हवी शांती
शांती आहे सर्जनशीलतेची जननी
सकारात्मक ऊर्जेनं मिळेल उमंग उभारII4II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
