You are currently viewing नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळण्यासाठी गावागावात कबड्डी महोत्सव व्हावेत – विनायक राऊत

नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळण्यासाठी गावागावात कबड्डी महोत्सव व्हावेत – विनायक राऊत

नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळण्यासाठी गावागावात कबड्डी महोत्सव व्हावेत – विनायक राऊत

निरवडेत आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन…

सावंतवाडी

नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कबड्डी महोत्सवासारखे उपक्रम गावागावात होणे गरजेचे आहेत.अशा उपक्रमासाठी आमचे कायम सहकार्य असेल असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला.दरम्यान निरवडे येथील श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळाने अशाप्रकारे स्पर्धा घेवून वेगळेपण जपले आहे.या उपक्रमात त्यांनी कायम सातत्य राखावे असेही ते म्हणाले.

श्री देव महापुरुष मित्र मंडळ निरवडे व हौशी कबड्डी संघटनेच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले,ॲड अनिल निरवडेकर, सरपंच सौ. सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, माजी सरपंच सदा गावडे, माजी सभापती प्रियंका गावडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र गावडे, सुभाष गावडे, लाडू गावडे, रवी जाधव, भिकाजी गावडे, गोविंद मोर्ये, विजय गावडे, नागेश गावडे, संतोष गावडे, अक्षय माशाळ,ओमप्रकाश तीवरेकर यांच्यासह सुनील माळकर चंदन गोसावी,विशाल पोपकर,सचिन माळकर चेतन माळकर संदेश पोपकर आदी उपस्थित होते.

श्री राऊत पुढे म्हणाले,प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद सातत्याने निर्माण ठेवायचा असेल तर विविध उपक्रम प्रत्येक गावांमध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र त्यासाठी काम करणारे कार्यकर्ते तेवढ्याच जिद्दीचे व मेहनत करणारे लागतात. बरीच मंडळ काही काळापुरते जन्माला येतात आणि पुन्हा मग अस्त पावतात. मात्र निरवडेतील या मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धा आयोजित करीत आहेत.याचा अभिमान वाटतो. मनामध्ये एक उमेद, उत्साह असला पाहिजे आणि तो घेऊन तुम्ही गावातील ग्रामस्थांच्या आनंदासाठी असे उपक्रम आयोजित करत असताना आमच्यासारखे लोकप्रतिनिधी नक्कीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

युवराज म्हणाले मंडळाच्या वतीने अशा प्रकारे स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मंडळाचे अभिनंदन आहे मंडळाने आयोजित केलेला उपक्रम स्तुत्य आहे त्यामुळे यापुढे सुद्धा अशीच उपक्रम राबवून खेळाडूंना संधी द्यावी मी आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा विश्वास व्यक्त केला. तर निरवडे येथील या मंडळाचे काम कौतुकास्पद आहे.यापुढे सुद्धा ज्या ठिकाणी अडचण येईल त्याठिकाणी तुमचा भाऊ म्हणून खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहीन असा विश्वास व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

सौ सुहानी गावडे म्हणाल्या, कबड्डी हा अतिशय उत्कृष्ट असा खेळ आहे. हा खेळ जेवढ्या ताकतीने खेळायचा तेवढ्याच तो बुद्धी कौशल्य वापरूनही खेळायचा आहे. आपल्या भारतातील अतिशय प्राचीन असा खेळ आहे आणि तो खेळ तुम्ही निवडला. दरम्यान कुठची गोष्ट सुरुवात करणं फार सोपं असतं पण त्यात सातत्याचे जे टिकवणं हे फार कठीण असतं आणि ते आमच्या युवा वर्गाने करून दाखवलेले आहे. तसेच या स्पर्धेला तहसीलदार श्रीधर पाटील,पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण माजी सभापती पंकज पेडणेकर कास सरपंच प्रविण पंडित यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्पर्धेला भेट दिली. तर मंडळाच्यावतीने निरवडे गावचे सुपुत्र अँड अनिल निरवडेकर,कला शिक्षक चंदन गोसावी, आणि उत्कृष्ट आर्टिस्ट तृणाली माळकर यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा