वेंगुर्ले तालुक्यातील निवती गावाकडून “ब्ल्यू फ्लॅग बीच” नामांकनासाठी प्रस्ताव
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले तालुक्यातील मेढा-निवती या ग्रामपंचायतीने “ब्ल्यू फ्लॅग बीच” नामांकनासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यानुसार, राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या टिमने निवती येथे दौरा केला. ब्ल्यू फ्लॅग नामांकनाचे सर्व निकष पूर्ण करण्यात आले असून याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती मेढा-निवती ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.