You are currently viewing बायकोच असते ग्रेट..

बायकोच असते ग्रेट..

बायकोच असते ग्रेट..

वाद तसा नेहमीचाच,
विधान आहे थेट
नवरा असला बेस्ट तरी
बायकोच असते ग्रेट।

महिनाभर कष्ट करून ,
कमवून आणतो पगार
त्या पैशाला श्रध्देनं
बायकोच देते आकार।

कमविलेल्या पैशांनीच जर
भरले असते पोट
तर रात्रीच्या जेवणात वाढली
असती हजाराची नोट।

आई बाप, भाऊ बहीण सोडून येते
नवर-यासाठीसगळं
सोसून नांदत राहते
उद्या लेकीच्या माहेरासाठी।

नवरा नावाच्या परीघाची
व्यास असते बायको
संसाराचा ध्यास आणि
श्वास असते बायको।

रखरखणा-या वाळवंटातील
बायको सुंदर बेट
नवरा असला बेस्ट तरी
बायकोच असते ग्रेट।।❤️

*संग्रह@अजित नाडकर्णी✒️

प्रतिक्रिया व्यक्त करा