You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे

सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी) :;

 

राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जाहीर करण्यात आले.

कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर नितेश राणे हेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, हे निश्चित होते. यावर आज शिक्कामोर्तब झाले. ना. नितेश राणे यांची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर सिंधुदुर्ग वासियांच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचे राजकीय वारसदार म्हणून ना. नितेश राणे यांच्याकडे पाहिले जाते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कारकीर्दीत सिंधुदुर्गात राज्य मंत्रिमंडळाची बैठकही झाली होती. त्यामुळे विकासाला चालना मिळाली. ना. नितेश राणे यांची अभ्यासूवृत्ती, प्रशासनावर वचक, त्यामुळे सिंधुदुर्गच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा