You are currently viewing “संविधान गौरव अभियान” वाडी – वस्तीवर पोहचवणार – प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई

“संविधान गौरव अभियान” वाडी – वस्तीवर पोहचवणार – प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई

 *संविधान गौरव अभियानाची कुडाळ – मालवण विधानसभेची बैठक संपन्न*

कुडाळ :

भाजपाची संविधान गौरव अभियानाची कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाची नियोजन बैठक कुडाळ भाजपा कार्यालयात संविधान गौरव अभियान चे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव, संविधान गौरव अभियान जिल्हा सहसंयोजक सौ.अदिती सावंत, कुडाळ अनु. जाती मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत वालावलकर, ओरस अनु. जाती मोर्चा अध्यक्ष विनोद कदम, कुडाळ अनु.जाती मोर्चा उपाध्यक्ष गुणाजी जाधव, कुडाळ अनु.जाती मोर्चा चिटणीस सुशील तांबे, कुडाळ तालुका संविधान गौरव अभियान सहसंयोजक विजय कांबळी, मा.नगरसेवक सुनील बांदेकर, ओरस किसान मोर्चा अध्यक्ष सुर्यकांत नाईक मान्यवर म्हणून उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना देसाई म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीत पसरविण्यात आलेले “फेक नरेटीव्ह” सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी “संविधान गौरव अभियान” राबवीणे आवश्यक आहे.

मोदीजींनी आणि भारतीय जनता पार्टीने सदैव संविधानाचा आदर केला असताना काँग्रेसने मात्र सदैव संविधानाचा आणि संविधान निर्माते डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. देशावर आणीबाणी लादुन काँग्रेसने त्या काळात संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारांवरही घाला घातला.

राष्ट्र प्रथम म्हणणारी भाजपा देशाच्या संविधानाचा पुर्ण आदर करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, संविधान हा त्याच्यासाठी धर्म ग्रंथ आहे. भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे मा.मोदी सच्चे उपासक आहेत. मोदीजींनी संविधानाने सर्वसामान्य माणसाला दिलेल्या मुलभूत अधिकारांचा सदैव सन्मान केला. देशात सर्वत्र संविधान लागु असले पाहीजे यासाठी मोदीजींनी ऐतिहासिक काम केले. ह्या सर्व गोष्टी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी “संविधान गौरव अभियान” वाडी वस्तीवर पोहचणे आवश्यक असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा