सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे २६ रोजी कोकण रेल्वेच्या २७ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन
विविध कार्यक्रमांसह रात्री ९ वाजता ‘गावय ‘ हे मालवणी नाटक होणार सादर
सावंतवाडी
कोकण रेल्वेचा २७ वा वर्धापन दिन सोहळा २६ जानेवारी रोजी सावंतवाड़ी रेल्वे स्थानक येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांसहीत रात्री ९ वाजता “”गावय” हे दोन अंकी मालवणी नाटक सादर करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे २६ जानेवारी १९९८ पासून मडगांव-सावंतवाडी -मुंबई विभागात सुरु झाली. त्यानिमित्त दरवर्षी सावंतवाडी स्थानकात वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. वर्धापनाचे यंदाचे २७ वे वर्ष आहे.
त्यानिमित्त सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १२ ते २ महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ८ वाजता सातवायंगणी पेंडूर येथील ओंकार वारकरी भजन मंडळाचे भजन होणार असून रात्री ९ वाजता ६३ व्या महाराष्ट्र नाट्य हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून सांघिक द्वितीय क्रमांक आणि चार वैयक्तिक पारितोषिक प्राप्त “गावय” हे दोन अंकी मालवणी नाटक होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा व नाटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे कर्मचारी वृंद सावंतवाडीच्यावतीने करण्यात आले आहे.