You are currently viewing श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा

श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम गीत रचना*

 

*”श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा”*

 

अयोध्येच्या रामास करूया वंदन

मूर्ती पाहून भारावले तन मनIIधृII

 

अयोध्या नगरी नटली नव्यानं

शरयू नदी झाली पुनश्च पावन

सर्वत्र विजय पताका गुढ्या तोरणं II1II

 

पंच शतकांच्या प्रतिष्ठेचा ऊच्च क्षण

राम मंदिर बनले राष्ट्र मंदिर भूषण

विश्वाला आदर्श वाटेल अभिमानII2II

 

रघुवीराचे सुंदर असीम लावण्य

मनमोहक मेघश्याम बालकराम

साठवावे रूप पाणावती लोचनं II3II

 

सर्व विश्वाचे तीर्थ पावन अधिष्ठान

पावन भक्त साधूं संत तप साधनानं

सृष्टी झाली मोदीत जाहले सत्य दर्शनII4II

 

श्रीराम विश्वाचे दैवत झाले सिद्ध

श्रीराम नाम संज्ञा आहे भेदातीत

विश्वाने अनुभवला सोहळा संपन्नII5II

 

राम विश्व मार्गदर्शक आदर्श जीवन

सर्व समस्यांवर उपाय रामबाण

सर्वांना आनंद मिळाला प्राणप्रतिष्ठेनंII6II

 

श्रीराम नामाची अनन्य आहेत विशेषणं

कितीही वर्णावे लेखणी राहे अपूर्ण

प्रार्थना सुख नांदूदे आम्ही आलो शरणII7II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा