*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्दांना नाही मापदंड….!!*
अतिवास्तवादाची भुरळ शब्दांना
अडकल्या माझ्या पिढ्या
वारसाहक्क पुढेही चालला
बांधल्या भविष्यात गढ्या..!
भूतकाळ वर्तमाना समोर
अचानक उभा ठाकला
अभिजात कालखंड पाषाणाचा
वर्तमानाला सांगू लागला..!
शब्दांना नाही मापदंड
थोपवून ठेवणं..हीचं कसरत
ह्दयांत उसळतात वादळं
शब्दांनाही सुचतं ..नसतं..!
मनापासून ओरडावसं कधीच
शब्दांना आवडत नाही
काळजाचे ठोके ऐकण्यास
शब्दांजवळ मापदंड नाही..!
उपेक्षितांचा झेलून शब्दरंग
ह्दय जपावं लागतं
शब्दमाझे असो..वा… दुस-यांचे
संस्कारातूनच मापदंड लाभत..!
बाबा ठाकूर