You are currently viewing ‘झाराप’ला अन्य गाड्यांचे वावडे का ?

‘झाराप’ला अन्य गाड्यांचे वावडे का ?

कुडाळ :

 

कोकण रेल्वेवर कोट्यवधी रुपये खर्चुन झाराप हे रेल्वेस्थानक बांधले खरे, पण रेल्वेच्या अनास्थेमुळे त्याचा योग्य वापरच होत नाही. आम्हा नागरिकांचा त्यामुळे अपमान झाला आहे. ‘झाराप’ च्या परिसरात अनेक गावे-वस्त्या आहेत. वास्तविक अन्य तेज गाड्या ‘झाराप’ला थांबल्या जाव्यात व झारापच्या परिसरातील नागरिकांची सोय होईल ही वास्तविक आम्ही मोठी अपेक्षा बाळगून होती, पण झाले विपरीतच दिवा- सावंतवाडी लोकलच फक्त थांबवून आमच्या तोंडाला रेल्वेने चक्क पाने पुसली आहेत.

 

‘झाराप’ला फक्त दिवा लोकलच, दिवा लोकलच जर थांबवायची होती तर कोट्यवधी रुपयांचा चुराडा रेल्वेने का केला? त्यांच्याकडे पैसे जास्त झाले आहेत का? आम्हा नागरिकांना फार मोठी आशा दाखवून रेल्वेने आमची क्रूर चेष्टा केली आहे. कुणाला व कुठे त्याबद्दल जाब विचारावयाचा? बऱ्याचदा अर्ज-विनंत्या करूनही

 

साऱ्यांनाच रेल्वेने केराची टोपली दाखविली आहे. पूर्वीचेच हाल आजूबाजूच्या गावकऱ्यांचे होत ‘आहेत. त्यांना सावंतवाडी व कुडाळ या मोठ्या स्थानकावर जाऊनच गाड्या पकडाव्या लागतात. भे वेळ व पैसा इतर खर्च व मनस्ताप होतो तो वेगळाच

 

‘झाराप’ है निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप हे पर्यटन स्थळ तरी रेल्वेने घोषित करावे म्हणजे पर्यटकांच्या रेट्याने तरी काही प्रगती होईल आमचे राजकारणीदेखील षंढासारखे बघत आहेत, त्यांचा काही उपयोग नाही.

 

-कमलाकर माणगावकर, भांडुप (प.)

7506951822

प्रतिक्रिया व्यक्त करा