You are currently viewing प्रजासत्ताक दिनानंतर शाळांमध्ये किलबिलाट शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक

प्रजासत्ताक दिनानंतर शाळांमध्ये किलबिलाट शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक

वृत्तसंस्था:

नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सध्या सुरू आहेत. दिवसाआड विद्यार्थ्यांचे वर्ग भरत असून, त्याच धर्तीवर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरणार आहेत. गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांच्या शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक राहणार आहे. शाळांमध्ये मुलाला पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्‍यक आहे. एकदाच विनंती अर्ज भरून घेतली जाणार आहे. सॅनिटायझर, मास्क शाळांमध्ये बंधनकारक राहणार आहे. एका विद्यार्थ्याला आठवड्यातून अंदाजे तीनदा वर्गांना हजर राहावे लागणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षक मिळून २०६, तर खासगी शाळांमध्ये दोन हजार २४९ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक राहणार असून, त्याप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.

ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

महापालिकेच्या शाळा- १०२

खासगी शाळा- ३०३

एकूण शाळा- ४०५

 

पाचवी ते आठवीचे विद्यार्थी

महापालिका शाळा- १५,४७६

खासगी शाळांचे विद्यार्थी- ९५,२९७

एकूण- १,१०,७७३

 

ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली ‘संक्रांत’; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

 

शिक्षकांची संख्या

महापालिका- ४७५

खासगी शाळा- २,१२७

एकूण- २,६०२

प्रतिक्रिया व्यक्त करा