सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री अजयकुमार सर्वगोड यांनी ओसरगाव तलावाची केली पाहणी!
कणकवली
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अजयकुमार सर्वगोड यांनी कणकवली तालुक्यांतील ओसरगाव तलाव परिसरातील सुशोभीकरण कामाची पाहणी केली.
यावेळी ओसरगाव माजी सरपंच बबली राणे उपस्थीत होते. यावेळी ओसरगाव तलाव परिसराचे सुशोभीकरणाचे काम दर्जेदार केले जाईल याची ग्वाही श्री.सर्वगोड यांनी दिली.
सा.बां.कार्यकारी अभियंता श्री. अजयकुमार सर्वगोड यांनी ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निवासस्थानी भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.