You are currently viewing शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे कार्य नेत्र दीपक – श्री सुधीर गाडगीळ

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे कार्य नेत्र दीपक – श्री सुधीर गाडगीळ

पुणे :

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि. जळगाव आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या आणि आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या 745 व्या जयंती महोत्सवी वर्षानिमित्त तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज साहित्य नगरी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज व्यासपीठ, मोरया मंगल कार्यालय, आळंदी देवाची येथे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील फाऊंडेशनचे पदाधिकारी, साहित्यिक, रशिक पत्रकार, वारकरी, टाळकरी, शिक्षक, विद्यार्थी यांच्या भव्य उपस्थितीमध्ये आनंदात आणि उत्साहात संपन्न झाले याप्रसंगी संमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्रातील मुलाखतकारांचे बादशहा म्हणून जे ओळखले जातात असे सुप्रसिद्ध निवेदक श्री सुधीर गाडगीळ यांनी याप्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे हे शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक कार्य उभ्या महाराष्ट्राला सुपरीचित असून हे कार्य नेत्र दीपक असून या फाउंडेशनचे झुंजार आणि कर्तव्यदक्ष संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या कार्याला माझा सलाम आहे असेही प्रसंगी श्री सुधीर गाडगीळ म्हणाले. याप्रसंगी गाडगीळ यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध मुलाखतकाराची झलक म्हणून या संमेलनाचे मुख्य आयोजक तथा शिवचरण

उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांची त्यांनी तीन प्रश्न विचारून मुलाखत घेतली याप्रसंगी डॉ.उज्जैनकर यांनी सुद्धा त्यांना समर्पक अशीच उत्तर दिलीत प्रसंगी या संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांची सुद्धा श्री सुधिर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली याप्रसंगी उपस्थित साहित्यिक, रसिक, कलाकारांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ढोल पथकासह आदिशक्ती संत मुक्ताई संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान देव, संत निवृत्तीनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, विठोबा, रुक्मिणी यांच्या वेशभूषा करून ग्रंथदिंडीत सहभाग नोंदवला तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी त्यांच्या एमआयटी संत ज्ञानेश्वर बी.एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आदिशक्ती संत मुक्ताई कडून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींना 750 फुटाची व 101 जाड वजनाची राखी बांधण्यात आली हे सुद्धा आकर्षणाचे केंद्र ठरले व या संमेलनाचे या राखीमुळे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद घेण्यात आली. संमेलनाचे संयोजक श्री ज्ञानेश्वर चरित्र समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश काळे संमेलनाच्या निमंत्रक कवयित्री सौ. रूपालीताई चिंचोलीकर सहनिमंत्रक डॉ. ज्ञानेश्वर पाटील सहसंयोजक अजित वडगावकर सहकार्या ध्यक्ष रामचंद्र कु-हाडे पाटील फाउंडेशनच्या कार्यकारणी खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर विशेष अतिथी बार्टी भारत सरकारचे महासंचालक सुनील वारे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई चे माजी सदस्य तथा साहित्यिक श्री विलास सिंदगीकर मंडळाचे विद्यमान सदस्य डॉ. राजेश गायकवाड आणि फाउंडेशनचे राज्यध्यक्ष डॉ.सुभाष बागल राज्य सचिव एडवोकेट सर्जेराव साळवे राज्य उपाध्यक्ष डॉ. अजयकुमार लोळगे राज्य उपाध्यक्ष विनोदभाऊ डिडवानिया राज्य सल्लागार तुळशीराम बोबडे प्रसिद्ध वक्ता डॉ. शिवानंद भानुसे राज्य प्रसिद्धीप्रमुख ह. भ. प. शंकर महाराज राजपूत राज्य संपर्कप्रमुख डॉ. अशोक शिरसाट डॉ. निशिकांत धुमाळ आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते. या उद्घाटन सत्राचे सुरेल सूत्रसंचालन फाउंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. राजकुमार कांकरिया, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. सुनील धनगर पुणे जिल्हा समन्वयक सौ. योगिता पाखले यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा