सेवानिवृत्त सैनिकांचा सैनिक पतसंस्थेतर्फे सन्मान
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेच्या वतीने आर्मी डे चे निमित्त साधुन बुधवार १५ जानेवारी रोजी पतसंस्थेच्या कोलगाव शाखेतील सभागृहात १ जानेवारी २०२४ ते ३१ डीसेंबर २०२४ मधील सेवानिवृत्त सैनिकांचा संस्थेचे सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
तसेच प्रतीवर्षीप्रमाणे संस्थेकडे ज्या ठेविदारांसाठी लागू असलेल्या ‘लकी डॉ ‘ योजनेची सोडत देखिल या दिवशी काढण्यात आली.
या वर्षी कोलगाव, वेंगुर्ला, मालवण, सावंतवाडी विभाग, कलंविस्त, या शांखाचे ठेविदार या योजनेचे मानकरी ठरले. या वेळी ३ मोपेड व ३ मोटरसायकल लकी ड्रॉ लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आल्या.
या वेळी संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ यांनी संस्थेच्या एकंदर ३४ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीचा व आर्थिक प्रगतीचा मागोवा घेतला. तर संस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर यांनी संस्था लवकरच २५० कोटी ठेवींचा टप्पा पार करणार असुन आता पर्यत लाभलेल्या सर्वाच्या योगदानाबददल समाधान व्यक्त केले.
या वेळी सत्कार मुर्ती सुभेदार मंगेश सावंत, सुभेदार मेजर बापु राऊळ, नायक पांडुरंग परव, नायक प्रमोद नाईक, नायक रामा गावडे, नायक नागेश गावडे, हवालदार सुरज सावंत, सुभेदार विष्णु देसाई, ऑ. लेप्टंनन उमेश वेंगुर्लेकर, सुभेदार किशोर ठाकुर, हवालदार निवास सावंत, हवालदार प्रसाद लोट, हवालदार महेश देसाई, हवालदार सचिन सावंत, हवालदार बाबुराव सावंत, सुभेदार मेजर राजाराम राऊळ, सुभेदार सिताराम दळवी, सुभेदार विनोद सावंत, सुभेदार लक्ष्मण सावंत इत्यादी निवृत्त सैनिक कुटुंबियांसहित उपस्थित होते.
तसेच संस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, व्हा. चेअरमन चंद्रकांत शिरसाट, संचालक दिनानाथ सावंत, सुभाष सावंत, भिवा गावडे, श्यामसुंदर सावंत, चंद्रशेखर जोशी, संतोष मुसळे, बाबू वरक, शांताराम पवार, शशिकांत गावडे, संचालिका प्रियांका गावडे. तज्ञ संचालक तातोबा गवस व
पद्मनाभ परब, शाखांचे स्थानिक संचालक, मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ तसेच जिल्हयातील विविध भागातील बहुसंख्य माजी सैनिक संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, ठेविदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या सर्वाचे संस्थेचे संचालक श्री. चंद्रशेखर जोशी यांनी आभार मानले. संध्याकाळी ४ वा प्रधान कार्यालय येथे हळदीकुंकु कार्यकम साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महीला भगीनी उपस्थीत होत्या.