You are currently viewing कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम कीर्तनकार करतात : सचिन वालावलकर

कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम कीर्तनकार करतात : सचिन वालावलकर

कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम कीर्तनकार करतात : सचिन वालावलकर

वेंगुर्ले येथे श्री रामेश्वर मंदिरात ‘वारकरी कीर्तन महोत्सवा’चे थाटात उद्घाटन..

वेंगुर्ले  :

कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना समजवण्याचं काम म्हणजेच समाज प्रबोधन करण्याचं काम कीर्तनकार करत असतात. परमेश्वराची वाणी या कीर्तनकारांच्या माध्यमातून लोकांच्या कानापर्यंत पोहोचते. आपण जगत असताना किती नम्रपणे जगावं आणि लोकांसाठी काहीतरी करावं ही भावना अशा कीर्तनासारख्या प्रबोधनातून वाढीस लागते असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी केले.

वेंगुर्ले तालुका समस्त वारकरी संप्रदायातर्फे वेंगुर्ला रामेश्वर मंदिर येथे वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन श्री. कुर्ले बुवा यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. वालावलकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना शहरप्रमुख उमेश येरम, सामाजिक कार्यकर्ते जी. जी. साळगावकर तसेच दाजी परब, वसंत तांडेल, भाई गुरव, रवि परब, सुनील परब, सुधाकर परब गुरुजी, रवींद्र केळुस्कर, भाऊ सातार्डेकर, सदा गिरप, मंगेश गुरव, प्रतीक खानोलकर, पंकज शिरसाट, अनिल मांजरेकर, अजित रेवंनकर, शाम रेवंणकर, सतीश कदम, प्रसाद गुरव, राजा वेंगुर्लेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना कुर्ले बुवा म्हणाले की, आपल्यावर भगवंताची कृपा आहे. त्यामुळे आपण त्याला विसरून चालणार नाही. किमान भगवंताचे ग्रंथ घरात ठेवलाय तरी ऊर्जा मिळेल, चांगली बुध्दी मिळेल हे लक्षात घ्या आणि कीर्तनात सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी आचरणात आणा असे आवाहन केले. यावेळी जी. जी. साळगावकर, उमेश येरम यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. वैभव खानोलकर यांनी मांनले.

दरम्यान काल पहिल्या दिवशी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज माने हेरवाडकर (हेरवड) यांचे कीर्तन संपन्न झाले. आज दि.१६ रोजी ह.भ.प.सोपानकाका मुळे माऊली (मुंबई), दि.१७ रोजी ह.भ.प.भूषण महाराज वरखले (रायगड), दि.१८ रोजी ह.भ.प.आनंद महाराज जाधव (करमळा), दि.१९ रोजी ह.भ.प.गणेश महाराज शिवगण (खेड-रत्नागिरी) यांचे वारकरी कीर्तन सादर होणार आहे. यांना ऋषी महाराज सुतार आणि दिगंबर दादा कदम हे पखवाज साथ तर ह.भ.प.प्रथमेश महाराज मेस्त्री आणि ह.भ.प.विघ्नेश महाराज मेस्त्री हे गायनाचार्य म्हणून साथ करत आहेत. तरी भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्ला तालुका वारकरी संप्रदायातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा