सिंधुदुर्ग प्रेस क्लबच्या कार्यक्रमासाठी राहुल नार्वेकर उद्या सावंतवाडीत…
सावंतवाडी
राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते सावंतवाडी प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती लावणार आहेत.
त्यांचा दौरा पुढील प्रमाणे, शुक्रवार दि. १७ जानेवारीला सकाळी १०.०५ वाजता मोपा विमानतळ , गोवा येथे आगमन व राखीव. दुपारी १२ वाजता मातोंड, ता. सावंतवाडीकडे प्रयाण. दुपारी १२.३० वाजता मातोंड येथून सावंतवाडी काझी शहाबुद्दीन हाॅल मध्ये आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग प्रेस क्लब वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. दुपारी ४ वाजता सावंतवाडी येथून मोटारीने पेंडूर ता. मालवणकडे प्रयाण. सायं. ५ वाजता पेडूर ता. मालवण येथे आगमन व राखीव. श्री. वेताळ देवस्थान ट्रस्ट, पेंडूर आयोजित देवीचा त्रैवार्षिक मांड उत्सव कार्यक्रमास उपस्थिती. सायं. ६.३० वाजता पेंडूर ता. मालवण जि.सिंधुदुर्ग येथून मोटारीने मोपा विमानतळ गोवाकडे प्रयाण.