You are currently viewing भाजपा च्या वतीने सावंतवाडी तालुक्यात ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वस्ती संपर्क करुन ” संविधान गौरव सभेचे ” आयोजन

भाजपा च्या वतीने सावंतवाडी तालुक्यात ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वस्ती संपर्क करुन ” संविधान गौरव सभेचे ” आयोजन

*भाजपा च्या वतीने सावंतवाडी तालुक्यात ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वस्ती संपर्क करुन ” संविधान गौरव सभेचे ” आयोजन*

*भाजपा सावंतवाडी तालुक्याची अनुसूचित जाती मोर्चाची ” संविधान गौरव अभियान ” ची नियोजन बैठक संपन्न* .

*सावंतवाडी तालुक्यातील तिनही मंडलात संविधान सभेचे नियोजन.*

भाजपा सावंतवाडी तालुका कार्यालयात तालुक्याची अनुसूचित जाती मोर्चाची बैठक जिल्हा उपाध्यक्ष तथा ‘ संविधान गौरव अभियान ‘ जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव , अनु.जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव जाधव , बांदा मंडल अनु. जाती मोर्चा अध्यक्ष संजय डिंगणेकर , अनु.जाती जिल्हा चिटणीस किशोर जाधव , स्वप्नील मठकर , दामोदर मठकर इ.मान्यवर उपस्थित होते .
यावेळी मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले की , देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम २६ नोव्हेंबर २०१५ रोजी ” संविधान दिन ” संपुर्ण देशभर साजरा केला गेला . भारतीयांना हे संविधान पवित्र व सर्वोच्च असून तेंव्हापासून आपण प्रत्येक वर्षी ” संविधान गौरव दिवस ” मोठ्या उस्ताहात साजरा करीत आहोत .
भारतीय संविधानाच्या ७५ व्या गौरवशाली प्रवासासंबंधी नुकतीच संसदेच्या दोन्ही सदनात व्यापक चर्चा झाली .संविधान निर्माते भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रेरणादायी कामे शक्य झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गरीब , शोषित व वंचितांच्या कल्याणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने अनेक ऐतिहासिक कामे करीत आहेत .
संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि , ” आपले संविधान आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी मार्गदर्शक आहे ” .आज विकसित भारत घडविण्याचे एकच ध्येय प्रत्येक देशवासीयांचे आहे .
केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ११ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यंत ” संविधान गौरव अभियान” मंडल ते बुथस्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे .
यामध्ये संविधान गौरव सभा , व्याख्यान , निबंध व वक्तृत्व स्पर्धा , वसतीगृह संपर्क , वस्ती संपर्क , संविधान प्रस्तावना वाचन , प्रबुद्ध व्यक्ती संवाद इत्यादी कार्यक्रम आयोजित करुन ” संविधान गौरव अभियान ” यशस्वी करायचे आहे, असे आवाहन केले .

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी.*

*_एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई संलग्न_*

*BCA प्रवेश प्रक्रिया 2025- 2026*

*🔴बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2025-26*

*_ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी.⭕_*

*📌 कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.*

*📔CET साठी महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन वर्ग घेतले जातील.*

*📌 बीसीए प्रवेश व सीईटीच्या मार्गदर्शनाकरिता खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा.*
https://chat.whatsapp.com/GproyGGMKOa8U0fh2goTkW

*अधिक माहितीसाठी :*
*7972997567 /9420274119*

*या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा.*

*जाहिरात
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा