मळगाव हायवे वर नॅशनल बसला पाठून टाटा डंपर धडकल्याने झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारांती रुग्ण पुढील उपचारासाठी गोवा बांबुळी येथे रवाना
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी केले मदत कार्य
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी तालुका मळगाव या गावातील हायवे वरती नॅशनल बसला पाठवून टाटा डंपर धडकल्याने अपघात होऊन तीन जण गंभीर झाले आहेत. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावातील रुग्ण केशव शंकर तारी तारेवाडी बाबुराव मानसिंग चव्हाण राहणार मुंबई मालाड इलियास खान राहणार मुंबई मालाड यांचा टाटा डंपर तसेच बस ब्रेक डाऊन झाली असताना मळगाव या हाय वे पुलावरती बसचे काम करत असताना बुधवार 15 जानेवारी रात्री नऊ वाजता टाटा डंपर ने पाठवून धडक दिल्याने मोठा अपघात झाला. यामुळे इथल्या ग्रामस्थांनी व पोलीस मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून डॉक्टर पांडुरंग वजराटकर जनरल सर्जन तसेच डॉक्टर निखिल अवधूत अस्थिरोगतज्ञ डॉक्टर वैष्णवी ड सारी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर आदर्श आडे पवार एमबीबीएस या उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी प्राथमिक उपचार करून तसेच औषधोपचार करून तीन ही रुग्ण पुढील उपचारासाठी गोवा बांबुळी येथे पाठवण्यात आले.
हा अपघात सायंकाळी 9 च्या सुमारास रात्री झाला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथील परिचारिका व आरोग्य कर्मचारी यांनी मोलाचे काम करून योग्य ते सहकार्य करून तसेच जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी मदत कार्य करून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मार्फत 108 रुग्णवाहिकेने या रुग्णांना पुढील उपचारासाठी गोवा बांबुळी येथे पाठवले आले अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली आहे यासाठी सावंतवाडीमध्ये पोलिसांमार्फत जवाब होऊन पुढील तपास पोलीस करत आहेत