*दहिबाव अन्नपूर्णा योजना दुरुस्तीला तांत्रिक मान्यता मिळाली – नामदार नितेश राणे*
*या योजनेसाठी तब्बल नऊ कोटी सत्तावीस लाख रुपये खर्चाच्या आराखड्याला मंजुरी*
*कोर्ले-सातंडी योजनेच्या सर्वेक्षणापाठोपाठ दहिबाव अन्नपूर्णा योजना दुरुस्तीला मान्यता मिळवून दिली*
*ट्रेंच गॅलरीसह नवीन पंप बसवणे इत्यादी कामाला मंजुरी मिळाल्याने दहिबाव अन्नपूर्णा योजना नूतनीकरण होणार*
देवगड
नामदार नितेश राणे यांनी दहिबाव अन्नपूर्णा योजनेच्या नळपाणी योजना दुरुस्तीला नऊ कोटी २७ लाख रुपयांच्या खर्चाला तांत्रिक मान्यता मिळवून दिली असून, यामुळे देवगड-जामसांडेचा पाणी प्रश्न तातडीने सुटण्यास मदत होणार आहे. यामध्ये नवीन पंप बसवणे व ट्रेंच गॅलरीचे काम नामदार नितेश राणे यांच्या आदेशानुसार घेण्यात आल्याने ही पाणी योजना पुन्हा नवे रूप धारण करील.
महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी कणकवली येथे देवगडचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये देवगडला पाणीपुरवठा करणाऱ्या कोर्ले-सातंडी धरणावरून नवीन योजना तयार करणे आणि जोपर्यंत ही योजना कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत देवगड-जामसांडे साठी सध्या अस्तित्वात असलेली दहिबाव अन्नपूर्णा योजना सुस्थितीत आणणे व पाणीपुरवठा करणे, असे दोन महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले होते.
यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे कोर्ले-सातंडी योजनेचे सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम काही दिवसांपूर्वीच सुरू झाले असून, ते आता अंतिम टप्प्यात आले आहे.
तर, दहिबाव अन्नपूर्णा योजनेच्या दुरुस्तीसाठी नामदार नितेश राणे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे.
या नव्या अंदाजपत्रकानुसार ही योजना सुस्थितीत आणून पुढे चालवण्यासाठी अनेक गोष्टी अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
यामध्ये ट्रेंच गॅलरीची दुरुस्ती, नवीन पंप बसवणे, पंप हाऊसची दुरुस्ती, उद्व वाहिनी व गुरुत्ववाहिनीची दुरुस्ती, जामसांडे भागातील पाइपलाइनची दुरुस्ती तसेच नेणे नगर येथील पाणी साठवण टाकीची दुरुस्ती, इत्यादी कामे अग्रक्रमाने करण्यात येणार आहेत.
नामदार नितेश राणे यांनी मंत्री झाल्यानंतर देवगडचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे जनतेकडून त्यांना शुभेच्छा आणि दुवा मिळत आहे.