मोटारसायकल अपघातात चारजण जखमी ; एकावर गुन्हा दाखल
कणकवली :
शहरानजीक वरचीवाडी रस्त्यालगत कणकवली हुन हरकुळच्या दिशेने जाणाऱ्या मोटर सायकलला समोरून विरुद्ध दिशेने आलेल्या मोटर सायकलची धडक बसल्याने अपघात झाला या अपघातात दोन्ही मोटरसायकल वरील चौघांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळतात स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. नाझिया हैदर खान ( वय ३५) हैदर आदम खान हे ( वय ४८ दोघेही रा. हरकुळ बुद्रुक), पांडुरंग मारुती जाधव वय ( ४०) तन्मय पांडुरंग जाधव वय (१०) (राहणार नाटळ जाधववाडी) हे जखमी झाले. या अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून उद्देश शांताराम जाधव यांच्या फिर्यादीवरून जखमी हैदर खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. चारही जखमींवर कणकवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.