वेंगुर्लेत “महाराष्ट्र श्री २०२५” स्पर्धेसाठी १९ जानेवारीला सिंधुदुर्ग संघ निवड चाचणी….
वेंगुर्ले
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अससोसिएशनच्या होणाऱ्या ६२ वी सिनियर व १० वी महिला महाराष्ट्र श्री २०२५ या स्पर्धेत सहभागी होणारा सिंधुदुर्ग जिल्हा संघ निवड चाचणी रविवार दिनांक १९ जानेवारीला दुपारी ३ वाजता श्री साई मंगल कार्यालय, वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आली आहे.
तसेच नमो चषक आयोजित सी टी आर क्लासिक या स्पर्धेसाठी देखील संघ निवड होणार आहे. मेन फिजिक, बॉडी बिल्डिंग, वूमन फिटनेस मद्ये सभागी होणाऱ्या स्पर्धाकांनी सोबत खालील कागत पत्र घेऊन यावीत. यामध्ये आधार कार्ड झेरॉक्स, आयकार्ड साईज दोन फोटो आणायचे आहेत. निवड झालेल्या स्पर्धकांना सिंधुदुर्ग जिल्हा संघात निवड केली जाईल व राज्य स्पर्धेत सिंधुदुर्ग संघ म्हणून सहभागी केले जाईल. तरी निवड चाचणी मध्ये जास्तीत-जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन बॉडी बिल्डर्स असोसिएशनसिंधुदुर्ग सचिव किशोर सोनसुरकर व अंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच यांनी केले आहे. तरी अधिक माहितीसाठी ९४२२५९६३७५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.