You are currently viewing जुई गावडे हिची राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत निवड

जुई गावडे हिची राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत निवड

जुई गावडे हिची राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत निवड

नागपूर येथे होणाऱ्या स्पर्धेत मुंबई विभाग संघातून खेळणार

मालवण

नागपूर येथे दिनांक 16 जाने ते 18 जानेवारी या दरम्यान होणाऱ्या 21 वर्षाखालील महाराष्ट्र राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत मालवण तालुक्यातील तिरवडे गावची सुकन्या कु. जुई हेमंत गावडे हिची मुंबई विभागीय संघात निवड झाली आहे.

मूळ मालवण तिरवडे येथील जुई ही मुंबई ठाणे येथे वास्तव्यास असून ठाण्याच्या नौपाडा येथील सरस्वती मराठी शाळेत शिक्षण घेताना वयाच्या 13 व्या वर्षांपासून विविध जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेत ठाणे जिल्हा, मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे.2021-22 मध्ये वेल्लोर तामिळनाडू येथे 16 वर्षाखालील गटाच्या राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे जुई गावडे सध्या ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालय शिक्षण घेत असून नुकत्याच पार पडलेल्या ठाणे जिल्हा आंतर विद्यापीठ हॉलीबॉल स्पर्धेत जुई च्या नेतृत्वाखाली जोशी बेडेकर महाविद्यालयाने अजिंक्यपद पटकवले होते. पश्चिम क्षेत्रीय विद्यापीठ स्पर्धेत ज्यात महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश येथील जवळपास 80 विद्यापीठांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत जुई गावडे हिने 2023 व 2024 मध्ये मुंबई विद्यापीठाचेही प्रतिनिधित्व केले आहे

कु. जुई गावडे हिची आता नागपूर येथे 16 ते 18 जानेवारी दरम्यान 21 वर्षाखालील हॉलीबॉल स्पर्धेसाठी मुंबई विभागातून खेळणार आहे.. तिच्या या निवडीमुळे आपल्या जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तिरवडे गावातील जुई गावडे हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा