*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी प्रा.सत्यवान घाडी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कोकणात आम्ही जावूया*
*********************
झुकझुक झुकझुक, कोकण गाडी
दाखवीत चालली,हिरवी झाडी
निसर्ग शोभा सारे पाहुया
कोकणात आम्ही जावूया।।धृ।।
कोकणचा तो थाट मोठा
कशाला नाही तिथे तोटा
मग कशाला शहरी राहुया
कोकणात आम्ही जावूया।।धृ।।१।।
कोकणच्या कडेकपारी
घुमती सारे ओहळ चौघडे
मंजूळ गाणी नित्य ऐकूया
कोकणात आम्ही जावूया।।धृ।।२।।
कोकणची आपली शेतीवाडी
तीच सुखाची आहे नाडी
काळ्या आईची सेवा करुया
कोकणात आम्ही जावूया।।धृ।।३।।
कोकणच्या माळावरती
गुरे वासरे खुशीने चरती
जपणूक त्यांची करुया
कोकणात आम्ही जावूया।।धृ।।४।।
कोकणचे ऊत्सव छान
चतुर्थीला या मिळतो मान
गणेशाचे भजन करुया
कोकणात आम्ही जावूया।।धृ।।५।।
कोकणचा आमच्या रान मेवा
खाऊन तब्येत चांगली ठेवा
एकतरी झाड आम्ही लावूया
कोकणात आम्ही जावूया।।धृ।।६।।
***********************************
*रचनाकार:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.
*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.
*ठाणे:-* दिवा.
*मो.नं.:-* ८९२८२९२२५४
🌳🌺🌴🌹🌾🌸☘️🪷🦚🌷🌳