पोदार इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण शैक्षणिक विकासा बरोबरच थ्रीडी प्रिंटींग सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविते
*प्राचार्या राणी मारीया झेवियर यांची पत्रकार परिषदेत माहिती
*नर्सरी पासून दहावीपर्यंत ६३५ विद्यार्थी घेत आहेत शिक्षण
*पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवलीच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा घेतला आढावा
कणकवली :
कणकवली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलने आपल्या पाचव्या वर्षात प्रदार्पण करताना शैक्षणिक उत्कृष्टता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यासोबत थ्रीडी प्रिंटींग सारख्या नाविन्यपूर्ण शिक्षण तंत्रज्ञानाच्या एकात्मकतेसाठी वेगळे स्थान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये भविष्यातील यशासाठी आवश्यक असणारे आधुनिक आणि उत्तम शिक्षण देण्यासाठी शाळा वचनपद्ध आहे. असे मत पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या राणी मारीया झेवियर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
प्राचार्या राणी मारीया झेवियर यांनी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पत्रकार परिषद घेतली त्या म्हणाल्या,
पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवलीची स्थापना १५ जानेवारी २०२० मध्ये झाली. त्यानिमित्ताने शाळा आपला पाचवा वर्धापन दिन साजरा करत आहे. शाळा सुरू केल्यानंतर आलेल्या कोविड महामारीची दोन वर्षे आणि त्यानंतरची तीन वर्षातील शाळेचे रिपोर्टकार्ड प्राचार्या राणी मारीया झेवियर यांनी पत्रकार परिषदेत ठेवले.यावेळी शाळा व्यवस्थापन अधिकारी अक्षय पेंढारी उपस्थित होते.
त्या म्हणाल्या पोदार स्कूल कणकवलीने परख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४ सारख्या शैक्षणिक उपक्रमामध्ये यशस्वीरित्या भाग घेतला आहे. हा एक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचा अनोखा अनुभव आहे. ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या एकुण कामगिरीचे मूल्यांकन करणे हा आहे. शैक्षणिक यशाबरोबरच स्कूलच्या युवा खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे खेळा मध्येदेखील शाळा उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
चौकट
विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिकण्याचा अनुभव
प्राचार्या झेवीयर म्हणाल्या, पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली ही शैक्षणिक तेज आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला लाभलेली एक अग्रगण्य संस्था असून यावर्षी तिचा पाचवा वर्धापन दिन साजरा करत आहे. नाविन्यपूर्ण शिकविण्याच्या पद्धतीवर जोरदार भर देवून व शाळा आपल्या अभ्यासक्रमात ३ डी प्रिंटींग सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिकण्याचा अनुभव मिळतो.
चौकट
नर्सरी पासून दहावीपर्यंत ६३५ विद्यार्थी
शाळा सुरू झाली त्यावेळी केवळ ८५ विद्यार्थी होते. आता मात्र, पाच वर्षात अगदी नर्सरी पासून दहावी पर्यंत ६३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात कणकवली परिसरासह देवगड, वैभववाडी, कुडाळ, ओरोस, मालवण आदी प्रमुख शहरांमधून ११ स्कूल बसच्या माध्यमातून विद्यार्थी दररोज आनंदी शिक्षण घेत आहेत.
चौकट
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न
पोदार स्कूलमध्ये शिकणारा कोणताही विद्यार्थी सर्वांगिण विकासामध्ये मागे राहणार नाही. ज्यांना अतिरिक्त
समर्थनाची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी उपचारात्मक शिक्षण पद्धतीचे अवलंब करण्यात येतो. ही पद्धत अतिरिक्त सराव आणि वैयक्तिक लक्ष प्रदान करते. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून अपेक्षित शैक्षणिक मानके पूर्ण करण्यास मदत करते. प्रत्येक विद्यार्थ्याला यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळेल याची खात्री करून वर्ग सर्व इयत्तांमध्ये उपलब्ध आहेत.अक्सा शिरगावकर, हिने तिरंदाजी मध्ये राष्ट्रीय स्तरावर सहावा क्रमांक मिळवला, वैखरी सावंत व ऋषिता शर्मा या विद्यार्थिनीने स्क्वॉशमध्ये जिल्हास्तरावर दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला. याव्यतिरिक्तही अनेक विद्यार्थ्यांनी गुणात्मक स्पर्धेत आपले प्राविण्य दाखवलेले आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांप्रती आम्हाला अभिमान असल्याचे प्राचार्य प्राचार्या राणी मारीया झेवियर यांनी सांगितले.
चौकट
शाळेचा संख्यात्मक कौशल्यावर भर
पोदार स्कूल, साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्यावर जास्त भर देते. वाचन प्रवाह, संख्या ओळखणे आणि इतर मुलभूत कौशल्ये वाढविण्यासाठी तयार केलेल्या आकर्षक प्रकल्पांव्दारे विद्यार्थी उच्च श्रेणींमध्ये अधिक प्रगत अभ्यासासाठी चांगले तयार होतात. आकलनाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सर्वसमावेशक शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी वर्ग चाचण्या, निदानात्मक चाचण्या आणि यश चाचण्या प्रत्येक धड्याच्या सुरूवातीला आणि शेवटी घेतल्या जातात.
फोटो
प्राचार्या राणी मारीया झेवियर