You are currently viewing जगण्याला अर्थ यावा

जगण्याला अर्थ यावा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जगण्याला अर्थ यावा*

 

मानवी जीवन

आहे फार मोलाचे

जगणे करायचे

उन्नत..‌

 

संस्कृती संस्कार

यांचे करायचे संवर्धन

सुविचारांचे आवर्तन

मनात…..

 

संपत्ती, ज्ञान

देता येईल तितके

वाटावे कौतुके

यथाशक्ती….

 

निसर्ग शिकवतो

इतरांना भरभरून द्यायचे

आनंदी ठेवायचे

स्वतः ला..‌…

 

सदैव ठेवावा

दातृत्वाचा आपण विचार

व्हावे उदार

इतरास्तव….

 

देण्यातील समाधान

जीवनात सदा अनुभवावे

आयुष्य करावे

चंदन…..

 

कुटुंब समाज

सर्वांना आधार द्यावा

जगण्याला यावा

अर्थ..‌….!

०००००००००००००००००००

अरुणा दुद्दलवार ✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा