*फोंडा येथील नामांकित जुगारी बैठकीला*
गेले आठ दिवस स्थानिक खाकीच्या आशीर्वादाने (मा)लग्याच्या बैठकीत जुगाराच्या गेम जोरात सुरू असून आ(ज)गाव येथील मंदीर नजिक घरात मालगो, थंदेश, परकाश, थाबल, थाटील, परवीण आदी तक्षिमदारांनी जुगाराची बैठक बसवली असून रोज दुपारी ३.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत ही बैठक चालते. कणकवली फोंडा येथील जुगाराचे नामांकन मिळालेले नामांकित जुगारी बैठकीला खास उपस्थित राहतात. वेंगुर्ला, तळवडे, शिरोडा यांचीही खेळी मोठी असते. प्रत्येक बैठकीला ३० हजार रुपये बाहेरचे काढले जातात यावरून बैठकीतील एका खेळातील आकड्यांचा अंदाज येईल. त्या व्यतिरिक्त खाकीची फेलसीपी महिना साठ हजार रुपये घेते, बीट अंमलदार ९०००/- रुपये, टपल्या, दगडकर आणि वांडरकर यांना प्रत्येकी ७०००/- रुपये दिले जातात. त्यामुळे जुगाराच्या बैठकीची पाठराखण करणाऱ्यांचे उत्पन्न भरमसाठ वाढले असल्याने जिल्ह्याचा जिडीपी सुद्धा वधारल्याचे दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी गावागावात जनसंवाद उपक्रम आयोजित केला असून अवैद्य धंद्याच्या विरोधात तक्रारी आहेत का..? याची माहिती घेत आहेत. परंतु तरीही झारीतील शुक्राचार्य अशी ओळख असणाऱ्या स्थानिक खाकिच्या शिलेदारांकडून आशीर्वाद लाभत असल्याने जुगार सुखात नांदत असून माहेरवाशी असलेल्या खाकीची बेकारी दूर होऊन ते मालामाल होत असल्याचे आणि युवक, तरुण, बेरोजगार होत असल्याचे चित्र समजात उभे राहिले आहे. त्यामुळे खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या जनसंवाद उपक्रमाला हरताळ फासून आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यात आ(ज)गाव येथील स्थानिक खाकी व्यस्त असल्याचे दिसत आहे.