You are currently viewing सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेगुर्ला येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेगुर्ला येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न

*सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेगुर्ला येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न*

वेंगुर्ला

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांच्या हस्ते फित कापून तसेच संत राऊळ महाराज काॅलेज कुडाळच्या प्राचार्या डाॅ. स्मिता सुरवसे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. या प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित नावीन्यपूर्ण वैज्ञानिक प्रतिकृतींचे सादरीकरण केले. यावेळी पदार्थविज्ञान या विषयाच्या पीएच.डी केलेल्या संत राऊळ महाराज काॅलेजच्या प्राचार्या डाॅ. स्मिता सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अगदी अभ्यासपूर्ण दिलेल्या उत्तरांनी डाॅ. सुरवसे मॅडम भारावून गेल्या. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक तर केलेच त्याच बरोबर विद्यार्थ्यांना शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचेही कौतुक केले. या प्रदर्शनासाठी शाळेतील चारही विद्यार्थी गटांना (Houses) विषय विभागून देण्यात आले होते.प्राथमिक (5वी ते 7वी) गटासाठी माहिती तंत्रज्ञान, जलसंधारण, गणित प्रतिकृती व टाकाऊ पासून टिकाऊ हे चार गटांसाठी चार विषय होते ,तर माध्यमिक (8वी ते 10 वी) गटासाठी चुंबकत्व, उष्णता,प्रकाश व उपग्रह तंत्रज्ञान हे चार विषय होते.
या प्रदर्शनाचे सूत्रसंचालन विज्ञान शिक्षिका सौ. स्वाती आजगावकर यांनी केले तर परीक्षण विज्ञान शिक्षक श्री. गजानन पालयेकर व श्री.नितीन कुळकर्णी यांनी केले.
प्राथमिक गटात यलो हाऊस गटाने सादर केलेल्या जलसंधारण विषयावर आधारित प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.या गटात सिया गावडे, पृथ्वीराज सावंत,आयुष नार्वेकर, ऋग्वेद तुळसकर या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. माध्यमिक गटात ब्ल्यू हाऊस गटाने सादर केलेल्या थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि ग्रीन हाऊस गटाने सादर केलेल्या प्रकाश या संकल्पनेवर आधारित नावीन्यपूर्ण प्रतिकृती यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला.ब्ल्यू हाऊस गटात ओम दीपनाईक,स्वदीप उकिडवे,मनोहर गावडे तर ग्रीन हाऊस गटात भूषण नाईक, वेद पाटील, क्रिस्टन डिसोझा व अथर्व पारकर या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. उपस्थित मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांचे त्यांनी सादर केलेल्या नावीन्यपूर्ण प्रतिकृतींचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख,सचिव आनंद परूळेकर, संचालक प्रशांत नेरूरकर,शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा, शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा