खानापूरच्या धर्तीवर हत्ती पकड मोहीम राबवा
तालुक्यातील सरपंच संघटनेची वनक्षेत्रपाल दोडामार्ग यांचे कडे मागणी
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी यांना हंगामात हत्ती नुकसानी सत्र सुरूच असल्याने वारंवार मागणी करूनही वन विभाग दखल घेत नसल्याने तालुक्यातील सरपंच संघटना आक्रमक भूमिका घेत असुन तातडीने खानापूर धर्तीवर बंदोबस्त करावा अशी मागणी वनक्षेत्रपाल दोडामार्ग यांचे कडे केली आहे
याबाबतचे सविस्तर पत्र दोडामार्ग वनक्षेत्रपाल यांना निवेदन देउन देण्यात आले आहे, याबाबत १५ दिवसात माहिती द्या, अशी सरपंच संघटनेची मागणी आहे यावेळी सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस सह अन्य सरपंच मोठया संख्येने उपस्थित होते