You are currently viewing शिवसेना ठेकेदार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राजा गावडे यांची नियुक्ती

शिवसेना ठेकेदार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राजा गावडे यांची नियुक्ती

शिवसेना ठेकेदार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राजा गावडे यांची नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र

मालवण :

चौके गावचे माजी सरपंच, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजन उर्फ राजा गावडे यांची शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग ठेकेदार संघटना अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी राजा गावडे यांना सुपूर्द केले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग ठेकेदार संघटना अध्यक्ष म्हणून राजा गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य करात असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा