बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी उद्या १५ ला वैयक्तिक आरोग्य तपासणी शिबिर…
बांदा
पीएम श्री योजनेअंतर्गत येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेतील सर्व विद्यार्थ्याच्या वैयक्तिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन १५ ला प्रशाळेत करण्यात आले आहे.
या आरोग्य तपासणी शिबिरात विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी तसेच त्वचा, कान, दात, डोळे इत्यादी विविध शारीरिक बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणीसाठी डाॅ. चेतना गावकर, डाॅ. मिताली सावंत, डाॅ. महेश पेडणेकर, डाॅ. पंढरीनाथ पणशीकर असे नामांकित डाॅक्टर व आस्था लॅब बांदा यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणार आहेत. या आरोग्य तपासणीचा शुभारंभ सकाळी १०.३० वाजता होणार आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या बाबतीत काही आरोग्याबाबत समस्या असेल तर वर्गशिक्षिकांना सांगावे किंवा या दिवशी पालकांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या पाल्याची तपासणी करून द्यावी असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे व मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी केले आहे.