*PRI CBO Convergence प्रकल्पाअंतर्गत तालुकास्तरीय सरपंच कार्यशाळा संपन्न*
सावंतवाडी
पंचायत समिती सावंतवाडी व उमेद अभियान यांच्या वतीने दि.१०जानेवारी रोजी PRI CBO Convergence project अंतर्गत तालुकास्तरीय सरपंच कार्यशाळा सार्वजनिक गणेशोत्सव सभागृह, सावंतवाडी येथे घेण्यात आली.
“गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत व उमेद चे महिला संघटन यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे . ग्रामपंचायत सोबत कार्यरत असणारे विविध विभाग आणि महिला संघटन यातून गावातील विविध समस्यांना उत्तर शोधता येईल”, असे मार्गदर्शन ‘कुडुंब श्री’, केरळ च्या श्रीम. गिरिजा संतोष यांनी केले.
“उमेश चे सावंतवाडी तालुक्याचे काम चांगले आहे सावंतवाडी हा मॉडेल तालुका म्हणून आहेच पण यापुढेही अजून चांगले काम करण्यासाठी आपण समन्वयाने अधिक प्रयत्न करूया “, असे आवाहन मान. गटविकास अधिकारी श्री.वासुदेव नाईक यांनी केले.
प्रकल्पाची उद्दिष्ट्ये, कुडुंबश्री ची ओळख , प्रकल्प उपक्रमामध्ये PRI आणि CBO ची भूमिका , आणि एकत्र काम केल्यामुळे विकासाची गती वाढण्यास कशी मदत होते, यशस्वी ग्रामसभा, citizen committee , उमेद चे कामकाज कसे चालते याविषयी चे मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले.
या कार्यशाळेत सहा.गटविकास अधिकारी श्री. मंगेश जाधव, उमेद चे जिल्हा व्यवस्थापक श्री. निलेश वालावलकर, तालुका अभियान व्यवस्थापक श्री प्रदीप ठाकरे , ३७ गावातील सरपंच, तालुका व्यवस्थापक श्री शिवानंद गवंडे, श्रीम. स्वाती रेडकर, श्रीम. रिधिमा पाटकर, DRT श्रावणी वेटे ,BRP निधी म्हापसेकर, उमेद चे प्रभाग समन्वयक, प्रभाग संघ व्यवस्थापक कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रकल्पाची माहिती देण्यासाठी सरपंचांची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल उपस्थित सरपंचांनी समाधान व्यक्त केले.
.______________________________
*संवाद मिडिया*
प्रिय पालक आणि विद्यार्थी,
आपल्या रत्नागिरीत पहिल्यांदाच फक्त *JEE आणि CET* परीक्षांच्या उत्कृष्ट तयारीसाठी सुवर्णसंधी!
*आता कोकणातील एकमेव IITian शिक्षक म्हणजेच राजवाडे सरांच्या च्या मार्गदर्शनाखाली विशेष बॅच सुरू होत आहे.*
✅ तज्ज्ञ मार्गदर्शन: IIT JEE / CETचे अनुभव आणि यशस्वी तंत्रशुद्ध अभ्यास पद्धती
✅ व्यक्तिगत लक्ष: प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर विशेष भर
✅ नवीनतम अभ्यासक्रम: JEE आणि CET साठी अद्ययावत नोट्स आणि टेस्ट सिरीज
✅ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: सुलभतेने शिकण्यासाठी डिजिटल साधने
आता आपल्या मुलाचे स्वप्न IIT किंवा उत्कृष्ट अभियांत्रिकी कॉलेजमध्ये जाण्याचे पूर्ण करा!
स्थाने आणि नोंदणीसाठी आजच संपर्क साधा:
📞 9653348536/9421141980
📍 [यश सिद्धी क्लास, शिर्के प्लाझा]
शिकण्याचा नवीन दृष्टीकोन आणि प्रेरणादायक वातावरणाची हमी!
सीमित प्रवेश – आजच नोंदणी करा!
“यश तुमच्या मुलाच्या भविष्याचा पाया होईल!”
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*