You are currently viewing मालवण येथे उद्या एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

मालवण येथे उद्या एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

मालवण येथे उद्या एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

मालवण

‘अश्वमेध’ करियर अकॅडमीच्या वतीने शनिवार २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मालवण येथील कन्याशाळा हायस्कूल येथे एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस, भारतीय सैन्य, अग्निवीर तसेच सरळ सेवा आदी प्रशासकीय भरतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील मुलांना शासकीय नोकऱ्या मिळाव्यात, या हेतूने अश्वमेध करियर अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या विविध विभागातील भरती प्रक्रिया विचारात घेता विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाबाबत असलेला न्यूनगंड दूर करण्यासाठी हे शिबीर घेतले जात आहे. शिबिरात सरकारी भरती प्रक्रिया कशी असते, कोणकोणत्या संधी आहेत, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कशा पद्धतीने करावा, याविषयी तज्ज्ञ अभ्यासकांचे विचार ऐकायला मिळणार आहेत. या शिबिरात पालक सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संस्थापक सिद्धेश आचरेकर (८२७५६४९२५४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा