*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री सौ. स्नेहा धोंडू नारिंगणेकर लिखित अप्रतिम मुक्तछंद काव्यरचना*
*जीवन जगायचं असतं*
जन्माने रक्ताचं नातं जोडलेलं असतं
प्रेम नी जिव्हाळ्याने बांधायचं असतं
विश्वासाच्या पायावर उभारायचं असतं
अनुबंध जोडत जीवन जगायचं असतं
सुख आणि दुःख दोन्ही झेलायचं असतं
कळी बनुन अलगत उंमलायचं असतं
पारिजातका सम दर्वळायचं असतं
सुगंधीत होत जीवन जगायचं असतं
वाहणाऱ्या वाऱ्यासंगे पळायचं असतं
तळपणाऱ्या उन्हात करपायचं असतं
रिमझिम पावसात भिजायचं असतं
ओलंचिंब होत जीवन जगायचं असतं
फुलांवर भिरभिरत फिरायचं असतं
भ्रमर बनून गुण गुणायचं असतं
कोमल पंखुडीत अडकायचं असतं
मकरंद चाखत जीवन जगायचं असतं
सुरवंटाच्या काट्या संगे खेळायचं असतं
फुलपाखरू बनवून उडायचं असतं
सप्तरंगी छटात बुडायचं असतं
इंद्रधनु होत जीवन जगायचं असतं
भूतकाळ आठवत शिकायचं असतं
वर्तमान अनुभवत घडायचं असतं
ध्येयाचं शिखर गाठायचं असतं
सुखी आनंदी जीवन जगायचं असतं
सौ. स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग
७०६६९९८७९६