You are currently viewing शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 26 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 26 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 26 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठी इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्र व दिव्यांग खेळाडू  यांनी दि. 26 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा  क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडामार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शासन निर्णय दि. २९ डिसेंबर, २०२३ अन्वये व शासन निर्णय दि. २५ जानेवारी, २०२४ नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली, २०२३ विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/व्यक्ती यांच्याद्वारा दि. 14 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज सादर करणाऱ्या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (Sorolling Link) मध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर दि. 14 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा