You are currently viewing मालवण तालुक्यात शिवसेनेचा धुव्वा; ६ पैकी ५ ग्रामपंचायती भाजपकडे !

मालवण तालुक्यात शिवसेनेचा धुव्वा; ६ पैकी ५ ग्रामपंचायती भाजपकडे !

शिवसेनेच्या ताब्यातील चिंदर, मसदे- चुनवरे ग्रा. पं. वरही भाजपची सत्ता

कार्यकर्त्यांच्या एकसंघ प्रचारामुळे भाजपचा विजय : धोंडू चिंदरकर

मालवण
मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक दारोदारी फिरूनही येथील मतदारांनी शिवसेनेला नाकारले आहे. तालुक्यातील सहापैकी पाच ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचे कमळ फुकले असून केवळ एका ग्रामपंचायतीवर शिवसेनेला यश मिळविता आले. शिवसेनेच्या ताब्यातील चिंदर आणि मसदे – चुनवरे या ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता मिळवली आहे. कार्यकर्त्यांच्या एकसंघ प्रचारामुळे आणि माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, आ. रविंद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिली आहे.
दरम्यान, या निकालानंतर भाजपने जल्लोष साजरा केला. तर शिवसेनेच्या गोटात सन्नाटा पसरला होता.
मालवण तालुक्यातील पेंडूर खरारे, मसदे-चुनवरे, गोळवण- कुमामे, चिंदर, कुणकावळे आणि आडवली-मालडी या सहा ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून मालवण तहसीलदार कार्यालयात या निवडणुकीची मतमोजणी घेण्यात आली.

प्रतिष्ठेच्या पेंडूर- खरारे निवडणूकीत भाजपचा एकतर्फी विजय

भाजप नेते, माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या गावातील पेंडूर – खरारे ग्रामपंचायत निवडणूक शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक या ठिकाणी तळ ठोकून होते. तर भाजपने येथे बहुतांशी ठिकाणी तरुण उमेदवार उभे करून शिवसेनेसमोर आव्हान उभे केले होते. या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवत शिवसेनेला धोबीपछाड दिला आहे. याठिकाणी भाजपचे ९ तर शिवसेनेचे उमेदवार २ ठिकाणी विजयी झाले. येथून भाजपच्या
प्रभाग एक – अश्विनी पेडणेकर (३०६), नितीन राऊळ (१३५), सुनीता मोरजकर (२१७), प्रभाग दोन – कृष्णा मांडकुलकर (२४९), समृद्धी सरमळकर (३०४), नेहा परब (३३०). प्रभाग तीन – सुमित सावंत (१९१), अंकिता सावंत (२११), प्रभाग चार – विवेक जबडे (२७७) यांनी विजय मिळवला. तर शिवसेनेचे संदीप सावंत (२९२), वैष्णवी लाड (३७१) हे उमेदवार विजयी झाले. ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आणण्यासाठी भाजप नेते दत्ता सामंत, अशोक सावंत, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, संदीप मेस्त्री, जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, संतोष साटविलकर, प्रचारप्रमुख संजय नाईक आदींनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.

शिवसेनेच्या ताब्यातील मसदे- चुनवरे भाजपच्या ताब्यात

शिवसेनेच्या ताब्यातील मसदे – चुनवरे ग्रामपंचायत भाजपने खेचून आणली आहे. याठिकाणी भाजपने ६ तर शिवसेनेने ३ जागांवर विजय मिळवला. येथून शिवसेनेचे प्रभाग एक – ऋतुजा नार्वेकर (१२९), केतकी प्रभू (१४५), अंकुश नेरूरकर (१५१) यांनी विजय मिळवला. तर भाजपकडून प्रभाग दोन – धनश्री कांदळकर (१७३), शमिका वाडकर (१७९), कलाधर कुशे (१६३), प्रभाग तीन – अनिल जाधव (१५९), रामदास पांजरी (१४५), श्रेया परब (१४६) या सहा उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. माजी सभापती अनिल कांदळकर यांनी येथून भाजपच्या विजयासाठी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा