You are currently viewing चिपी विमानतळाला कुलूप मारूनच दाखवा – नारायण राणे

चिपी विमानतळाला कुलूप मारूनच दाखवा – नारायण राणे

चिपी विमानतळाला कुलूप मारूनच दाखवा – नारायण राणे

घराला कुलूप लावले नाहीतर नाव सांगणार नाही, वैभव नाईकांना इशारा…

कणकवली

तांत्रिक कारणामुळे चिपी विमानतळ बंद आहे. मात्र ते लवकरच सुरू होईल. मात्र या मुद्द्यावर काही विरोधक प्रसारमाध्यमातून धमक्‍यादेत आहेत की चिपी विमानतळाला कुलूप ठोकणार. तुम्‍ही टाळे मारूनच दाखवा नाही तुझ्या घराला टाळे मारले तर नाव सांगणार नाही, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला. तसेच आता जर कोणी बोलला तर मी सोडणार नाही. घरात, दारात येऊन उभा राहणार पुढचे मला माहीत नाही, असेही ते म्‍हणाले.

जिल्‍हा भाजपतर्फे आयोजित कणकवली पर्यटन महोत्‍सवाचा समारोप येथील उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणातील भव्य मंचावर झाला. यावेळी श्री.राणे बोलत होते ते म्‍हणाले की, चिपी विमानतळाला टाळे ठोकण्याची कोण धमकी देत असेल तर पोलिसांना सांगतो की त्‍यावर गुन्हे नोंदवा.

ते म्‍हणाले की, टीव्हीवर दिसणाऱ्या कलाकारांना एकदा प्रत्यक्ष पहावे यासारखा दुसरा आनंद नाही. माझ्या जिल्हावासीयांनी कलेचा आनंद लुटावा म्हणून सिंधु पर्यटन महोत्सव सुरू केला. पर्यटनातून आर्थिक समृद्धी सिंधुदुर्गात यावी, यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेत आहोत. सी वर्ल्ड होणार, वैभववाडी कोल्हापूर ट्रेन होणार. प्रत्येक घरात रोजगार देणार हा माझा निर्धार आहे. दोडामार्ग मध्ये १२०० एकर मध्ये हजारो कारखाने उभारण्याचा संकल्प आहे. १९९० पासून मागील ३५ वर्षात अनेक अनुभव घेतले. घर जाळतानाही आंनद वाटला. खोटे आरोप करतानाही आनंद वाटला. मला वाटलेलं माझं गाव आहे. माझ्या जिल्ह्यातील माणसे चांगली असतील. पण काही वाईट अपवादक आढळले.

जिल्ह्यात पाणी टंचाई संपवली. वाडी तिथे रस्ते आणले. इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज च्या माध्यमातून उच्च शिक्षणाची सोय केली. लाईफटाईम हॉस्पिटल आणले. वृद्धश्रम बनवला.

राणे म्‍हणाले, कणकवली मतदारसंघात ५९ हजारांच्या मताधिक्याने मंत्री ना. नितेश राणेंना विजयी केलात. तुमचे उपकार मंत्री ना. नितेश विसरणार नाही. कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास मंत्री ना. नितेश राणे करणार यात शंका नाही. साधी बालवाडी काढू शकले नाहीत ते आम्हाला मिडीयातून धमकी देतायत. अडीच वर्षे सत्ता असताना उबाठा सेनेने कायम तोडपाणी करण्यासाठी विरोध केला. आता सत्ता आमची आहे. मुख्यमंत्री असताना किंवा ३० वर्षे सत्तेत असतानाही कधी विरोधकांशी सुडबुद्धी ने वागलो नाही. राजकीय जीवनातील हे माझे हे ११ वे पद आहे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ते खासदार पदे मिळाली, कणकवली पर्यटन महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमावेळी खा. नारायण राणे बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले की, सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सव ही संकल्पना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची आहे. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या प्रेरणेतून मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या सहकार्यातून कणकवली पर्यटन महोत्सव आयोजित करत आहोत. मंत्री ना. नितेश राणे यांच्या आशीर्वादाने याहीपूढे मोठे कलाकार कणकवली पर्यटन महोत्सवात येतील, असा विश्वास श्री. नलावडे यांनी कणकवलीकरांना दिला.

यावेळी खासदार नारायण राणे यांच्या हस्ते गायक पवनदीप राजन आणि अरुनीता कांजीलाल, चेतना भारद्वाज यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा