राठिवडे येथे स्वामी समर्थ पालखी-पादुका परिक्रमा
सावंतवाडी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्यावतीने श्री स्वामी समर्थ पालखी पादुका महाराष्ट्र परिक्रमा सोहळा श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ राठिवडे यांनी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ, राठिवडे येथे आयोजित केला आहे.
१ फेब्रुवारीला सायं. ४ वा.या परिक्रमेचे आगमन होणार आहे. २ फेब्रुवारी रोजी स. ७.३० वा. प्रस्थान करणार आहे. या सोहळ्यानिमित्त १ रोजी दुपारी ३ वाजता मोफत नेत्रतपासणी व मोफत चष्मा वाटप डॉ. संजय जोशी करणार आहेत.