वेंगुर्ला
वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायत वर शिवसेना पुरस्कृत सागरतीर्थ गाव विकास पॅनेलने तर आरवली ग्रामपंचायतवर भाजपा पुरस्कृत आरवली गाव विकास पॅनेलने वर्चस्व मिळविले आहे.वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ व आरवली या दोन ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रक्रिया आज वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे पार पडली.यामध्ये सागरतीर्थ ग्रामपंचायतीवर शिवसेनेने ५ जागांवर विजय मिळविला. तर आरवली ग्रामपंचायतीवर भाजपाने ५ जागांवर विजय मिळविला.वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ व आरवली या २ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या होत्या.सागरतीर्थ ग्रामपंचायत येथे ३ प्रभागातील ८ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात होते.यामधून यापूर्वीच प्रभाग क्र.३ मधून समृद्धी संतोष कुडव या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या होत्या.येथे शिवसेनेचे वर्चस्व राखताना ४ जागांवर विजय मिळविला. १ सदस्य याअगोदरच बिनविरोध निवडून आल्याने येथे शिवसेनेचे ५ सदस्य निवडून आले आहेत.२ सदस्य काँगेस आघाडीचे,२ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये प्रभाग क्र.१ मधून प्रणय कमलाकर बागकर,स्मिता बेनित फर्नांडीस, मेरी फ्रान्सिस फर्नांडीस,प्रभाग क्र.२ मधून ज्ञानदेव श्रीधर चोपडेकर,पांडुरंग सुरेश फोडनाईक,सुषमा राधाकृष्ण गोडकर,प्रभाग क्र.३ मधून एकनाथ शंकर कुडव व गायत्री स्वप्निल गोडकर इत्यादी उमेदवार विजयी झाले आहेत. आरवली ग्रामपंचायत येथे ३ प्रभागातील ९ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात होते.यामध्ये भाजपने आपले वर्चस्व राखताना ५ जागांवर विजय मिळविला. ३ जागांवर शिवसेनेचे उमेदवार व १ जागेवर काँगेस आघाडी सदस्य विजयी झाले आहेत.यामध्ये प्रभाग क्र.१ मधून प्रविण भाऊ मेस्त्री,समिर आनंद कांबळी, रिमा एकनाथ मेस्त्री,प्रभाग क्र.२ मधून किरण जनार्दन पालयेकर,शिला बाळा जाधव,वैशाली विजय रेडकर,प्रभाग क्र.३ मधून तातोबा भास्कर कुडव,सायली सत्यवान कुडव,अक्षता उदय नाईक इत्यादी सदस्य निवडून आलेआहेत.
विजयानंतर भाजपा – शिवसेना – काँग्रेस च्या पदाधिकारी – कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.सागरतीर्थ ग्रा.प.वर भगवा फडकवल्यावर शिवसेना पदाधिकारी यांनी जल्लोष केला.आरवली ग्रामपंचायतवर भाजपचे ५ सदस्य निवडून आल्यानंतर भाजपा पदाधिकारी यांनी जल्लोष केला.तसेच काँग्रेस आघाडीचे सदस्य निवडून आल्यानंतर काँग्रेस पदाधिकारीनीही जल्लोष केला.