*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तो कनवाळू*
***********
निरवतेला मिठीत घेता घेता
एकांतात या मी हरवुनी गेलो
झुळझुळणाऱ्या बेधुंद समीरा
अलवार नित्य झेलीत राहिलो
संवेदनांचे अपूर्व भाव अतर्क्य
अमृत समजुन प्राशीत राहिलो
नभाळी त्या प्रतिबिंब प्रारब्धाचे
श्वासासंगे सदा शोधीत राहिलो
तो फुलवारू अन तो कनवाळू
अंतरात मी आता स्मरु लागलो
***********************
*विगसातपुते.* *भावकवी*