*श्रमश्री बाजीराव सातपुते यांचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न*
पिंपरी
“बाजीराव सातपुते हे मातेशी आणि मातीशी नाळ जुळलेले व्यक्तिमत्त्व आहे!” असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संकल्प गार्डन कार्यालय, आळंदी रोड, वडमुखवाडी, चऱ्होली येथे शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी काढले.
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने पंतप्रधान श्रमश्री पुरस्कारप्राप्त बाजीराव सातपुते यांच्या सेवानिवृत्ती आणि एकसष्ठीनिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, एस. के. एफ. एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष सुनील आव्हाळे, माजी सभापती सुभाष उमाप, श्रमश्री बाजीराव सातपुते यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “पंतप्रधान श्रमश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी पत्नीऐवजी आईला सोबत दिल्ली येथे नेले. आईवडिलांकडून त्यांच्यावर श्रमसंस्कार झाले आहेत!” पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी, “विविध कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा अभ्यास करून त्यांचे चरित्र आधी व्याख्यानातून आणि नंतर लेखनातून बाजीराव सातपुते यांनी जनमानसात पोहोचवले. आत्ता सेवानिवृत्ती झाली असली तरी त्यांची सामाजिक कार्याची वृत्ती असल्याने अनेक उपक्रम ते राबवतील!” अशी ग्वाही दिली. सुनील आव्हाळे यांनी, “बाजीराव सातपुते यांनी आयुष्यात नेहमी वेळेला आणि श्रमाला महत्त्व दिले!” अशी माहिती दिली. सुभाष उमाप यांनी सातपुते कुटुंबीयांसोबत असलेल्या दीर्घकाळ स्नेहबंधाच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी सुवासिनींनी विधिवत औक्षण केले. नंतर मान्यवरांकडून
तुकोबांची पगडी, गाथा, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल प्रदान करून बाजीराव सातपुते यांना सन्मानित करण्यात
आले. सत्काराला उत्तर देताना त्यांनी, “एखाद्या कामगाराचा अभीष्टचिंतन सोहळा इतका हृद्य होऊ शकतो याचे नवल वाटले. ग्रामीण भागातून आलेला मी एक शेतकऱ्याचा मुलगा, पिंपरी – चिंचवडमध्ये शिकायचे पैसे मिळतात म्हणून उद्योगनगरीत आलो. भाजी विकण्यापासून अनेक कष्ट केले. यंत्रावर घाम गाळून लेखणीतून साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या वाटचालीत पद्मभूषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री नारायण सुर्वे, भाई वैद्य, प्र. चिं. शेजवलकर, नागनाथ कोत्तापल्ले अशा अनेक दिग्गजांचा सहवास लाभला. एसकेएफ माझी दुसरी आई आहे!” अशा भावना व्यक्त केल्या. सुदाम भोरे यांनी, “बाजीराव सातपुते यांनी, “छोट्या खेड्यातून येऊन कष्टसाध्य यश संपादन केले आहे; तसेच कौटुंबिक सौख्य जपत त्यांनी सामाजिक कार्याचा वसा जपला आहे!” अशी पुष्टी दिली. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. मनीषा सातपुते यांनी “हंबरून वासराले चाटते जवा गाय…” या कवितेचे अभिवाचन केले.
त्यापूर्वी, ‘एक झाड आईसाठी | एक झाड राष्ट्रासाठी ||’ उपक्रमांतर्गत सातपुते यांच्या आई – वडिलांच्या हस्ते सकाळी दहा वाजता वृक्षारोपण करण्यात आले. दुपारी बारा वाजता तळवडे येथील इंद्रायणी वृद्धाश्रमातील माता – पित्यांसमवेत स्नेहभोजन करण्यात आले. दुपारी पाच वाजता अभीष्टचिंतन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते मधुमेहमुक्त भारत अभियानाचे पाईक डॉ. राजेंद्र माने, सेंद्रिय खते व वनस्पतीजन्य औषध निर्मितीसाठी संशोधन करून डॉक्टरेट प्राप्त करणारे डॉ. संभाजी सातपुते आणि अभिजात पाली भाषेचे प्रसारक अन् प्रचारक महेंद्र भारती यांचा विशेष सन्मान करण्यात आला. साहेबराव सातपुते, अरुण गराडे, नितीन हिरवे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. मनाली सातपुते यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
______________________________
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*वारस होऊ सैनिकी परंपरेचे…*
https://sanwadmedia.com/156399/
काळानुरूप जलदगतीने बदलत जाणाऱ्या शैक्षणिक गरजा, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या
युगात, वाढत्या स्पर्धात्मक जीवनात जिद्दीने आणि महत्वाकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे विद्यार्थी
निर्माण करण्याचे पवित्र आणि प्रामाणिक ध्येयरूपी कार्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन
असोसिएशन संचलित शासनमान्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली गेली 21 वर्षे अविरतपणे करित आहे.
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
👉शैक्षणिक वर्ष 2025 – 26 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ६ वी च्या वर्गासाठी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
https://forms.gle/vPE7oVGpsLmEUMw68
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*जाहिरात
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*