सावंतवाडी हॉस्पिटलचा ट्रांसफार्मर डीपी दडला काटेरी झुडपात एमईसीबीच्या सहकार्याने सामाजिक बांधिलकी कडून स्वच्छता.
सावंतवाडी
सावंतवाडी हॉस्पिटल ट्रांसफार्मर डीपीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांच्या वेली वायरी मध्ये गुठाळ्याने स्पार्क होत होतं. याची कल्पना उपजिल्हा रुग्णालयातील इन्चार्ज राणे सिस्टर यांनी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना दिली असता रवी जाधव यांनी तत्काळ एमईसीबी चे अधिकारी खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधला व त्यांचे कर्मचारी अक्षय गावकर, धनंजय मांजरेकर व सचिन धोंड यांची मदत घेऊन लगेचच तासाभरात सदर झाडे झुडपे तोडून डीपी- ट्रांसफार्मर कडे जाणारी वाट मोकळी केली व सदरचे ठिकाणची सर्व झाडे झुडपे कर्मचाऱ्यांनी तोडून ती जागा साफ करून सर्व वायरीवरच्या वेळी तोडून टाकल्या त्यामुळे सतत होणार स्पार्क सदर कर्मचाऱ्यांच्या तत्काळ मदतीमुळे दूर होऊन पुढे होणारेरी दुर्घटना टळली यासाठी हॉस्पिटल इन्चार्ज राणे सिस्टर यांनी सामाजिक बांधिलकीचे व एमईसीबीचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानते.
सोमवारी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना भेट देऊन सदर डीपीच्या कॅम्पस मध्ये पेवर ब्लॉक बसवून देण्याची मागणी करणार आहे जेणेकरून पुन्हा मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढवून त्या ठिकाणी स्पार्क होऊन अनर्थ घडू नये यासाठी सदर मागणी संदर्भात निवेदन देणार आहे. तसेच मीटर असलेली शेड पूर्णपणे मोडखळीस आली आहे त्याचीही दुरुस्ती करण्याची मागणी करणार.
त्याचप्रमाणे सदर डीपी (ट्रांसफार्मर) कॅम्पस मध्ये दारूच्या बॉटल फोडून टाकल्यामुळे सदर एमईसीबीच्या पायाला काचा लागून इजा झालेल्या आहे याचाही बंदोबस्त करण्याची विनंती करणार आहोत.
प्रसंगी सामाजिक बादलकीचे रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी या कामासाठी पुढाकार घेऊन सतर्कता दाखवल्यामुळे उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.