You are currently viewing शिरोडा येथे होणार “मालवणी बोली साहित्य संमेलन”

शिरोडा येथे होणार “मालवणी बोली साहित्य संमेलन”

*साहित्य प्रेरणा कट्टा, आजगावचे आयोजन*

 

वेंगुर्ला :

मालवणी बोलीचे संगोपन, संवर्धन आणि संशोधन करण्याच्या दृष्टिने विचार विनिमय व्हावा असा प्रबळ उद्देश ठेऊन साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक मालवणी कवी भोवतालकार श्री विनय सौदागर यांच्या नेतृत्वाखाली ३१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०४.०० ते ०८.०० या वेळेत र.ग.खटखटे ग्रंथालय, शिरोडा यांच्या सहयोगाने र.ग.खटखटे ग्रंथालय, शिरोडा येथे मालवणी बोली साहित्य संमेलन पार पडणार आहे.

मालवणी ही आपली मायबोली आज गाव शहरातून हळूहळू लुप्त होत चालली आहे. मुलांनी शुद्ध मराठीत बोलावे, सुसंस्कृत म्हणजे शुद्ध मराठीत बोलणे असा समज करून घरात सर्व मालवणी बोलले तरी मुलांना मात्र मराठी शिकविले जाते. इंग्रजी शाळांचा अट्टाहास करून बोलीभाषेचा ऱ्हास होताना दिसून येतो. मोठ्या शहरात गेल्यावर आपल्या गाववाल्याशी सुद्धा मराठीत संवाद साधून मालवणी विसरली जाते. जन्मापासून आपल्या मुखातून वदणारी कानाला ऐकताना आनंद अन् गोडवा देणारी आपली मालवणी बोली जपणे, जतन संवर्धन करणे यासाठीच हे मालवणी बोली साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या मालवणी साहित्य संमेलनात पुढील प्रमाणे कार्यक्रमांचे नियोजन असेल. यात अध्यक्षीय भाषण, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन, समारोप.

सहभागी साहित्यिकांची नोंदणी/चहापान- दु. ३.३० पासून सुरू होईल. अशी माहिती साहित्य प्रेरणा कट्टा, आजगावचे समन्वयक व आयोजक श्री विनय सौदागर यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी मो. ९४०३०८८८०२ संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा