You are currently viewing रविवार दिनांक १२ जानेवारीला ‘परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिर

रविवार दिनांक १२ जानेवारीला ‘परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिर

*रविवार दिनांक १२ जानेवारीला ‘परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिर*

पिंपरी

लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट युथ टीम आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिका आयोजित इयत्ता दहावीच्या (एस. एस. सी.) मार्च २०२५ मधील परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ०७:४५ वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे एमजेएफ ला. विजय सारडा (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर), विशेष उपस्थित विजयकुमार थोरात (सहा. आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका) आणि अध्यक्ष एमजेएफ ला. प्रदीप कुलकर्णी यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन होणार असून पुणे प्रांतपाल बी. एल. जोशी, महानगरपालिका संगणक विभाग विभागप्रमुख नीळकंठ पोमण, ला. शैलजा सांगळे, लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सचे अध्यक्ष नंदिता देशपांडे, सचिव अनुजा करवाडे, खजिनदार विनायक केळकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.

या मार्गदर्शन शिबिरात एसएससी बोर्ड सदस्य डॉ. सुलभा विधाते (शास्त्र), डॉ. जयश्री अत्रे (गणित) आणि अर्चिता मडके (एक्झाम टेक्निक्स) हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या गुणात १००% वाढ होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला असून उपस्थित विद्यार्थ्यांना नि:शुल्क सराव प्रश्नोत्तर संचाचे वितरण करण्यात येईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी सकाळी ७:४५ ते ८:१५ या वेळेत नावनोंदणी करावी. विनामूल्य प्रश्नसंचासाठी http://qt-codes.io/aK1isl या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना उपयुक्त असलेल्या या नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी
संपर्क क्रमांक ९०४९९९२८०७/८/९
यापैकी कोणत्याही एका क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजक लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्स यांच्या वतीने करण्यात आले आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी.*

*_एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई संलग्न_*

*BCA प्रवेश प्रक्रिया 2025- 2026*

*🔴बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2025-26*

*_ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी.⭕_*

*📌 कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.*

*📔CET साठी महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन वर्ग घेतले जातील.*

*📌 बीसीए प्रवेश व सीईटीच्या मार्गदर्शनाकरिता खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा.*
https://chat.whatsapp.com/GproyGGMKOa8U0fh2goTkW

*अधिक माहितीसाठी :*
*7972997567 /9420274119*

*या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा.*

*जाहिरात
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा