वैभव नाईक यांनी चिपी विमानतळाला कुलुप लावणे आणि ते प्रसिद्ध करणे हास्यास्पद – श्री. सुरेश सावंत
कणकवली
वैभव नाईक यांनी चिपी विमानतळाला कुलुप लावणे आणि ते प्रसिद्ध करणे *एखाद्या छोट्याश्या खाडीतल्या माश्याला कोणीतरी उचलुन महासागरात सोडाव तशी किमया घडली नसुन महासागरातल्या माश्याला खाडीत फेकुन द्यावं अश्या प्रकारचे घडलेली घटना आहे.* आपण अश्या प्रकारची कुलुप लावण्याची भाषा करणे हे जनतेला नवल वाटण्यासारखे नाही कारण आपल्या नेतृत्वाने हेच काम मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्षे केलेले आहे. त्याच्यामुळे मुंबई मधील अनेक गिरण्या कारखाने चांगल्या चांगल्या कंपन्या बंद होऊन सुस्थितीत असणाऱ्या मराठी कोकणी लोकांना देशोधडीला लावले आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मराठी कोकणी माणूस आज मुंबई बाहेर म्हणजे अंबरनाथ, कर्जत, कसारा, वसई-विरार नालासोपारा गुजरातच्या सीमेपर्यंत रेल्वेचे धक्के खात आहेत. आणि कुलूप लावणे हे आपल्या पक्षाचे ब्रीदवाक्य आहे हे जनतेला माहीत आहे. म्हणुनच गेल्या विधानसभेत जनतेने आपला पराभव केला हे मान्य करत असल्याचे लक्षण आहे यात काही शंका नाही.
विमानतळ चालु ठेवणे म्हणजे मालवणचे एसटी स्टँड चालू ठेवण्यासारखे नाही. आपण मालवण एसटी स्टँड गेल्या दहा वर्षात चांगल्या सुस्थितीत करू शकला नाहीत याचे उत्तर जनतेला द्या नंतरच चिपि विमानतळावर बोला. आपण गेली दहा वर्षे कुडाळ मालवण मतदार संघात विकासाची जी घाण करून ठेवली आहे ती घाण साफ करण्यासाठी सध्या निवडूण आलेले आमदार निलेश राणे करत आहेत. उदा. रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य तसेच समुद्र किनारी असलेले बीच या कामावर पांघरून घालण्याचे काम करू नये. याची संपूर्ण माहिती कुडाळ- मालवण मतदार संघात जनतेला मीडिया मार्फत माहिती मिळत आहे आणि प्रत्येक्षात पाहत आहे याची आपण नोंद घ्यावी.
आपण पुढे किती आलो आणि मागे किती गेलो आहे हे प्रथम तपासा आणि कशामुळे आपण पुढे जाऊ शकलो नाही हाच विचार प्रधान मानून काम करावे असा माझा आपल्याला सल्ला आहे. *_*सिंधुदुरर्गासाठी परमेश्वराने जी दोन रत्ने उच्चशिक्षित आणि चांगल्या घराण्यातील आमदार म्हणुन पाठवलेली आहेत ते कसे काम करतात याचे अनुकरण करा त्याचा बोध घ्या आणि नंतरच टीका करा.