सिंधुदुर्ग :
जिल्हा पोलीस दलाकडून जिल्हयातील सर्व गावामधील नागरीकांशी थेट संवाद साधण्याचे अनुषंगाने दिनांक ०९/०१/२०२५ ते २३/०१/२०२५ रोजीपर्यंत “ग्रामसंवाद” उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हे देखील उपस्थित राहणार आहेत. ग्रामसंवाद उपक्रमामध्ये पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने जास्तीत-जास्त गावांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येणार आहेत.
या उपक्रमामध्ये गावातील डॉक्टर, समाजसेवक, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी (NGO), तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कोतवाल, सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, प्रतिष्ठीत नागरीक, व्यापारी, माजी सैनिक, जेष्ठ नागरीक, स्थानिक ग्रामस्थ (महिला व पुरुष ) सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत विभागातील अधिकारी/कर्मचारी विद्युत विभाग तसेच इतर शासकिय विभागातील अधिकारी / कर्मचारी यांना नियोजित ग्रामसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरीता याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.
ग्रामसंवाद उपक्रमाचा उद्देश गावातील उत्सव, धार्मिक वा जातीय तंटे, आरोग्य व स्वच्छता त्याचप्रमाणे अवैध धंदे व इतर तक्रारी / समस्यांयाबाबत चर्चा विनीमय आणि उपाययोजना. त्याचप्रमाणे सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, रस्ते सुरक्षा व अंमली पदार्थाबाबत व्यापक जनजागृती आणि लोकाभिमुख व जनहितार्थ उपक्रम व योजना यासंदर्भात माहिती गावातील सर्व स्तरातील नागरीकांशी थेट संवाद साधुन देण्यात येणार आहे.